जळगावात सेवानिवृत्त पोलिसाला 25 हजारांचा गंडा : मदतीच्या बहाण्याने एटीएम बदलले
Retired policeman duped of Rs 25,000 in Jalgaon: ATM changed under the pretext of help जळगाव (2 डिसेंबर 2025) : सेवानिवृत्त पोलिसात एटीएममध्ये मदतीचा बहाणा करून 25 हजार 700 रुपयात गंडवण्यात आले. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी एसबीआय मुख्य शाखेच्या एटीएममध्ये घडली. जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
चंदूआण्णा नगरातील रमेश हरचंद मोरे (66) हे 29 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास किराणा घेण्यासाठी पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये गेले. पहिल्यांदा कार्ड टाकूनही पैसे निघाले नाहीत.
त्याचवेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने मदत करण्याच्या नावाखाली पीन टाकण्यास सांगितले. मोरे यांनी पीन टाकल्यानंतरही पैसे न निघाल्याने त्या अनोळखी इसमाने कार्ड परत दिल्याचे भासवून हात-चलाखीने कार्ड अदलाबदल करून तो पसार झाला.
मोरे घराकडे निघाल्यानंतर ख्वाजामिया चौकात पोहोचताच त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. मेसेजनुसार त्यांच्या बँक खात्यातून तीन वेळा पैसे काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली. एकूण रक्कम 25,700 इतकी होती.
मोरे यांनी एटीएममध्ये झालेल्या अदला-बदलीचा संशय घेत त्वरित जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध सुरू आहे.


