शिंदखेड्यात मतांसाठी पैसे : 50 हजारांची रोकड जप्त ; अनोळखीविरोधात गुन्हा
Money for votes in Shindkheda: Cash worth Rs 50,000 seized; Crime registered against unknown person शिंदखेडा (2 डिसेंबर 2025) : शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूलच्या आवारात मतदारांना पैशांचे आमिष दाखवून पैसे वाटप करण्याच्या उद्देशाने एक जण आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने धाव घेतली मात्र पथक येताच संशयीत 50 हजारांची रोकड व ब्लू प्रिंट मशीन जागीच सोडून पसार झाला. याप्रकरणी अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले शिंदखेड्यात
शिंदखेड्यातील जनता हायस्कूलच्या आवारात एका पक्षातील कार्यकर्ता मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मतदानासाठी प्रोत्साहीत करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली मात्र यावेळी संशयीत 50 हजारांची रोकड व ब्लू प्रिंट मशीन जागीच सोडून पसार झाला. या प्रकरणी सहाय्यक कृषी अधिकारी हर्षल दिनकर पाटील (35, नवलनगर, धुळे) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.


