फैजपूरात 72.80 टक्के मतदान : आता निकालाकडे नजरा
फैजपूर (2 डिसेंबर 2025) : फैजपूर पालिकेत अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवडणूक झाली. एकूण 27 हजार 484 मतदारांपैकी 20 हजार 38 मतदारांनी हक्क बजावल्याने येथे 72.80 टक्के मतदान झाले.
पालिका निवडणुकीत एकूण 30 मतदान केंद्र होते.
उशिरापर्यंत चालली प्रक्रिया
फैजपूर येथे प्रमुख लढत भाजपच्या दामिनी सराफ व राष्ट्रवादीच्या सुमया शेख कुर्बान यांच्यात दिसली. शहरात एकूण 27 हजार 484 मतदार असून त्यांना 10 प्रभागांमधील नगरसेवक पदाचे 62 उमेदवारांना मतदान करायचे होते. त्यास सकाळपासून प्रतिसाद मिळाला. विशेषत: प्रभाग क्रमांक एकच्या बुथवर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी 5.30 वाजता मतदान केंद्राच्या आवारात असलेल्यांना टोकन देऊन गेट बंद करण्यात आले. यानंतर उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालली.
गत वेळेचा कल असा
2016 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यात भाजपच्या महानंदा होले 6954 मते घेऊन विजयी झाल्या होत्या. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार रफत तडवी यांना 6300, काँग्रेस उमेदवाराला 1740 आणि शिवसेना उमेदवाराला 1700 मते मिळाली होती.


