वरणगाव पालिकेबाहेर भाजपाचे बंडखोर उमेदवार सुनील काळेंसह कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

मतमोजणी 3 रोजी करण्याची केली मागणी


वरणगाव (3 डिसेंबर 2025) : अपिलात गेलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी 20 रोजी मतदान व 21 डिसेंबरला निकाल देण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर नागपूर खंडपीठाने निवडणुकीत मतदारांवर प्रभाव न पडण्यासाठी 3 रोजीचा निकाल 21 रोजी जाहीर करण्याचे आदेश राज्यभरात पालिकांना दिले. निवडणूक आयोगाच्या या आदेशाविरोधात वरणगावातील भाजपाचे बंडखोर उमेदवार सुनील काळे यांनी नगरपालिका कार्यालयाबाहेर मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली व 3 रोजी निकाल जाहीर करण्याची मागणी केली.

न्यायालयाच्या आदेशाचा आदर
प्रसंगी सुनील काळे म्हणाले की, 19 दिवस निकालाची प्रतीक्षा हा उमेदवारांवर अन्याय असून न्यायालयाच्या आदेशाचा आपण आदर करतो, असेही काळे म्हणाले. 3 रोजी मतमोजणी करण्याच्या मागणीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना त्यांनी पत्र दिले.

19 दिवस उमेदवार किंवा प्रतिनिधींना स्ट्राँगरुमम्धे थांबणे शक्य नसल्याने 3 रोजी मतमोजणी करावी, अशी मागणी सुनील काळे यांनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !