मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी 65 टक्के मतदान : उमेदवारांची आता 21 तारखेच्या निकालावर नजर


मुक्ताईनगर (3 डिसेंबर 2025) : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवडणूक झाली. मंगळवारी दिवसभरात 24 हजार 263 एकूण मतदारांपैकी 15 हजार 636 मतदारांनी आपला हक्क बजावल्याने 65 टक्के मतदान झाले.

दिवसभर मुक्ताईनगर शहरात मतदान केंद्रांवर राडा
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान दिवसभर गोंधळाचे व राड्याचे वातावरण दिसले. प्रभाग क्रमांक एकमध्ये सकाळीच गोंधळ झालेला होता. त्यानंतर अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्रभाग क्रमांक 16 व 17 मध्ये बोगस मतदान झाल्याच्या संशयावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी पोलिस अधिकार्‍यांनी प्राथमिक माहितीवरून बोगस मतदान झाले नसल्याचे सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !