दहा हजारांची लाच मागणी भोवली : धरणगाव पंचायत समितीच्या गृहनिर्माण अभियंत्यासह दोघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bhowli demands bribe of Rs 10,000: Two including Dharangaon Panchayat Samiti’s housing engineer caught by Jalgaon ACB भुसावळ (3 डिसेंबर 2025) : घरकुलाचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी करणार्या धरणगाव पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (31) व खाजगी पंटर सागर शांताराम कोळी (30 ,निंभोरा, ता.धरणगाव) यांच्याविरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना जळगाव एसीबीने मंगळवार, 3 रोजी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण ?
धरणगाव तालुक्यातील तक्रारदाराला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर आहे. योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर 3 फेब्रुवारी रोजी जमा झाला आहे तर दुसर्या खात्याचे अनुदान 15 हजार रुपये आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निधी नसल्याचे कारण पुढे केले मात्र गावातील लोकांनी अनुदानाचा हप्ता आल्याचे सांगितल्याने तक्रारदाराने 8 जुलै 2025 रोजी गणेश पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी अनुदानाच्या लाभासाठी दहा हजारांची लाच मागितली व यानंतर तक्रारदाराने 14 रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणीदरम्यान लाच मागणी केल्याचे समोर आले व 16 रोजी खाजगी पंटर सागर कोळीच्या मोबाईलवरून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली मात्र संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, योगेश दुसाने, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आदींच्या पथकाने केली.


