शीतल तेजवानीच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा नंबर कधी ? विरोधकांचा सवाल
When will Parth Pawar’s number be after Sheetal Tejwani’s arrest? Opposition questions पुणे (4 ऑक्टोबर 2025) : 300 कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी अखेर शीतल तेजवानीला पोलिसांनी अटक केली असून आता उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना अटक कधी करणार? असा सवाल विरोधकांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न गाजण्याचे चिन्हे आहेत.
काय आहे नेमके प्रकरण ?
पुण्यातील मुंढवा येथील बॉटनिकल गार्डनची 40 एकर सरकारी जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला विक्री प्रकरणी पॅरामाउंट कंपनीची संचालक शीतल तेजवानीला 3 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. या घोटाळ्यात 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटींत पार्थ यांच्या कंपनीने खरेदी केली. त्यासाठी मुद्रांक शुल्काचे सहा कोटीदेखील भरण्यात न आल्याने पार्थ पवारांच्या अटकेचा नंबर कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. दीड महिन्यापूर्वी हा घोटाळा उघड झाला. प्रचंड गदारोळ झाल्यावर खरेदी करार रद्द केल्याची घोषणा अजित पवारांनी केली मात्र अजूनही पार्थ यांनी 21 कोटी रुपयांचा भरणा केलेला नाही. शीतलवर 7 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 26 दिवसांनी कारवाई झाली. 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असल्याने अटकेचा दिखावा केला असा विरोधकांचा आरोप आहे.


जमीन व्यवहार करण्यापूर्वी पार्थ यांनी इरादापत्र तयार केले. आर्थिक आणि कायदेशीर व्यवहार करण्यासाठी स्वत:चे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांना सर्व अधिकार दिल्याचे दिसून येते. इरादापत्रावर पार्थ पवार यांची सही देखील दिसून येत आहे परंतु जमीन गैरव्यवहाराचा गुन्हा पार्थ पवार यांच्याऐवजी दिग्विजय पाटील यांच्यावर झाला आहे.
शेतकरी फसवणूक केल्याच्या प्रकरणात दोन गुन्हे दाखल
तेजवानी मूळ पिंपरीची रहिवासी आहे. तिचा पती सागर सूर्यवंशीला सेवा विकास सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात अटक झाली आहे. तेजवानीवरही गुन्हा दाखल असून तिची सीआयडी, ईडीनेही चौकशी यापूर्वी केलेली आहे. शेतकर्यांची फसवणूक केल्याचे 2 गुन्हे यापूर्वी तिच्यावर दाखल आहेत.







