रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची : तत्काळ तिकीट काढताना आता ओटीपी विचारल्यावरच मिळणार तिकीट

राजधानी, शताब्दी एक्स्प्रेससाठी 5 डिसेंबरपासून नवा नियम लागू


Now you will get the ticket only after asking for OTP while booking a Tatkal ticket भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार मध्य रेल्वेकडून तत्काळ बुकिंग प्रणालीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता तत्काळ तिकीट काढताना प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविल्या जाणार्‍या वन टाइम पासवर्ड (ओटीपी) च्या पडताळीनंतरच तिकीट जारी केले जाणार आहे. तातडीच्या प्रवासासाठी तिकीट मिळविताना होणारा गैरवापर थांबविणे आणि वास्तविक प्रवाशांना अधिक पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने तिकीट मिळावे, यासाठी ही नवी प्रणाली 5 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे.

ओटीपी कन्फर्म होताच जारी होणार तिकीट
तत्काळ तिकीट काढतांना प्रवाशांना आता जो मोबाईल नंबर सुरू आहे, त्या मोबाईलचा नंबर आरक्षण तिकीट फॉर्मवर नंबर टाकायचा आहे. तात्काळ तिकीट काढतांना फॉर्मवर दिलेला मोबाईल नंबरवर ओटीपी नंबर येणार आहे. तो नंबर संबंधित आरक्षण तिकीट खिडकीवर सांगितल्यावर त्या प्रवाशाला तिकीट मिळणार आहे. ही प्रमाणीकरण प्रणाली 5 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता लागू करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 22221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससाठी 5 डिसेंबरपासून तर गाडी क्रमांक 12025 पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेससाठी 1 डिसेंबरपासून ही नवी व्यवस्था सुरू झाली आहे.



मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन
नवीन ओटीपी आधारित प्रणाली पीआरएस (तिकीट खिडकी) काउंटर, अधिकृत एजंट, आयआरसीटीसी वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार्‍या सर्व तत्काळ बुकिंगवर लागू होणार आहे. प्रवाशांनी तिकीट बुकिंग करताना वैध आणि सक्रिय मोबाईल क्रमांक देणे अत्यावश्यक राहणार आहे. तिकीट बुक झाल्यानंतर ओटीपी त्या मोबाईलवर पाठविला जाईल आणि तो योग्यरीत्या पडताळणी झाल्यानंतरच बुकिंग पूर्ण होईल. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या नव्या नियमाची नोंद घेऊन तिकीट बुकिंग करताना दिलेला मोबाईल क्रमांक सक्रीय ठेवावा, जेणेकरून तत्काळ तिकीट मिळविण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !