भुसावळ नगरपालिका निवडणुकीतील मतदान यंत्रांचे गोदाम ‘नो-मॅन झोन’

एसआरपीएफकडून परिसराचा ताबा : मतमोजणीपूर्वी सुरक्षा कडक


Voting machine warehouse for Bhusawal municipal elections ‘no-man zone’ भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीनंतर शहरातील मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या गोदामाला प्रशासनाने पूर्णपणे नो-मॅन झोन घोषित केले आहे. मतमोजणीला अवघे 18 दिवस उरले असताना सुरक्षेची कोणतीही तडजोड टाळण्यासाठी एसआरपीएफने गोदाम परिसराचा ताबा मंगळवारी रात्री घेतला. संपूर्ण रात्रंदिवस येथे कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

अतिरीक्त कुमक तैनात
तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामाभोवती बारिक नजर ठेवण्यासाठी अतिरिक्त फोर्स नियुक्त करण्यात आला आहे. परिसरात सामान्य नागरिक, राजकीय कार्यकर्ते तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. गोदामाभोवती बॅरिकेटस् उभारण्यात आले असून सर्व हालचालींवर सीसीटीव्हीमार्फत लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या दिवशीच महसूल विभागातील अधिकार्‍यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यावेळीही प्रवेश प्रक्रिया काटेकोर तपासणी व ओळख पडताळणीसह सुरक्षितरीत्या होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. निवडणुकीचा प्रामाणिकपणा व मतदान प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत आहे.



एसआरपीएफच्या जवानांचा पहारा
मतदान केंद्रांवरून आलेले मतदान यंत्रे ही मंगळवारी रात्रीच गादोमात ठेवण्यात आली. यावेळी एसआरपीएफ व स्थानिक पोलिस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. या परिसरराचा एसआरपीएफच्या जवानांनी रात्रीच ताबा घेतला, या भागात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अश्या सूचना त्यांनी दिल्यात. हा परिसर नो मॅन झोन घोषीत केल्याने या भागात मतमोजणीपर्यत कोणीही जाऊ शकणार नाही.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !