आंबापाणीतील विषबाधा झालेल्या महिलेचा मृत्यू
यावल (4 ऑक्टोबर 2025) : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील आंबापाणी येथे एका 47 वर्षीय महिलेने फवारणीचे औषध असलेले ग्लास मध्ये नजरचुकीने पाणी पिऊन घेतले आणि तिला विषबाधा झाली. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने उपचाराकरीता यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
यावल पोलिसात नोंद
आंबापाणी, ता.यावल गावातील सायरा मुन्ना पावरा (47) या आपल्या घरी असताना त्यांनी फवारणीचे औषध असलेल्या ग्लासमध्ये नजरचुकीने पाणी पिले आणि तिला विषबाधा झाल्यानंतर तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वसीम तडवी करीत आहे.









