भुसावळातील बालकाचा उघड्या डीपीचा शॉक लागल्याने मृत्यू


भुसावळ (4 डिसेंबर 2025) : पतंग उडवत असताना उघड्या डीपीचा शॉक लागल्याने दुर्गेश दीपक ठाकूर (9) या चिमुकल्याचा मृत्यू झाला. यावेळी दुर्घटनेत प्रणय गिरीश रुल्हे (14) हा जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी 10.30 वाजता घडली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात

याप्रकरणी नोंद करण्यात आली.



काय घडले चिमुकल्यासोबत
बुधवार, 3 रोजी सकाळी दुर्गेश हा मित्र प्रणयसोबत पतंग उडवत असताना उघड्या डीपीचा त्यांना शॉक लागला. यात दुर्गेशचा मृत्यू तर प्रणय जखमी झाला. घटनास्थळी असलेल्या वीज कंपनीच्या डीपीला दरवाजा नाही. या उघड्या डीपीने दुर्गेशचा बळी घेतला. दुर्गेश याच भागातील पालिकेच्या शाळा क्र. 35 मध्ये चौथीत होता. त्याच्या पश्चात लहान भाऊ आहे. आई वडील मजुरी करतात. जखमी प्रणयवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !