चुकून फवारणीचे औषध मिसळलेले पाणी प्यायल्याने सांगवीतील मजुराची प्रकृती गंभीर
A laborer in Sangvi is in critical condition after accidentally drinking water mixed with pesticide. यावल (5 डिसेंबर 2025) : यावल शहरातून चोपड्याकडे जाणार्या रस्त्यावर कृष्णा चव्हाण यांच्या शेतात एका 52 वर्षीय शेतमजुराने शेतात काम करत असताना त्याला तहान लागली असता चुकून एका प्लास्टिकच्या कॅन मध्ये फवारणीचे औषध मिसळलेले पाणी प्राशन केल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याच्यावर यावल ग्रामीण रूग्णालयात प्रथमउपचार करून जळगाव हलवण्यात आले.
मजुराला जळगावी हलवले
यावल शहरातील शेतकरी कृष्णा चव्हाण यांचे यावल चोपडा रस्त्यावर शेत आहे. त्यांच्या शेतात कामासाठी बुधवारी जीवन यशवंत मेघे (52, रा.सांगवी बुद्रुक, ता.यावल) हे शेतमजुर मजुरी करतात. त्यांना तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी झाडाखाली गेले. तेथे असलेल्या एका प्लास्टिकच्या कॅन मध्ये फवारणीचे औषध पाण्यात निश्चित करून ठेवले होते. त्यांनी ते चुकून प्राशन केले. हा प्रकार निर्दशनास येताचं त्यांना तातडीने यावल ग्रामीण उपचाराकरिता दाखल केले.




डॉ.गौरव भोईटे, अधिपरिचारीका मंजुषा कोळेकर, बापू महाजन यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.