दीपनगरचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांना पीएच.डी
Retired Chief Engineer of Deepnagar R.R. Bavaskar gets Ph.D. भुसावळ (5 डिसेंबर 2025) : दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांना चेन्नई येथे मानद पीएचडी (डॉक्टरेट इन ऍडमिनिस्ट्रेशन) बहाल करण्यात आली. साउथ वेस्टर्न युनिव्हर्सिटी द्वारा डॉक्टरेट इन ऍडमिनिस्ट्रेशन या विषयावर आर.आर.बावस्कर यांना चेन्नई येथे मानद पीएचडी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली.
एमएसईबी सेवेत असताना सहाय्यक अभियंता या पदावर रुजू होऊन-उपकार्यकारी अभियंता-आपल्या गुणवत्तेवर कार्यकारी अभियंता पदोन्नत होऊन-मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा प्रशासनाचा कुशल असा अनुभव आणि सामाजिक कार्याचे कर्तुत्व वाचनाचा व्यासंग लक्षात घेता विद्यापीठाने त्यांना मानद पदवी देऊन गौरव करण्यात आला.



