थंडीचा कडाका वाढला : रविवारनंतर तापमानात पुन्हा दोन अंशांनी होऊ शकेल घट
The cold has intensified : Temperatures may drop by two degrees again after Sunday भुसावळ (5 डिसेंबर 2025) : शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात चढ-उतार होत असेल तरी थंडीचे प्रमाण कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान 13 ते 14.3 अंशांवर तर बुधवारी किमान तापमान 14.0 अंशांवर राहिले. तापमानात काही अंशी बदल होत असले तरी थंडीचा तडाखा कायम आहे. रविवार, 7 डिसेंबरपासून किमान तापमानात पुन्हा दोन अंशांनी घसरण होऊन पारा 11 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तवला आहे.
वातावरणामुळे सूर्यकिरण 30-40 टक्के कमी तीव्र होतात यामुळे जमीन आणि हवा कमी गरम होते, ज्यामुळे दिवसभरातील कमाल तापमान 1-2 डिग्रीने कमी राहते व रात्रीच्या थंडाव्यात देखील वाढ होते. पुन्हा एकदा थंडी वाढली असून, आगामी तीन ते चार दिवसानंतर कमाल तापमानात 2 डिग्रीची घसरण होण्याचा अंदाज आहे. मध्य भारतातून उत्तर महाराष्ट्राकडे ताशी 8-12 किमी ताशी वेगाने वाहत आहेत. या थंड हवेमुळे गारवा वाढला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे दाबात हलकी घसरण होत असल्याने, हवा खाली येते आणि थंडता वाढतो. उच्च दाबामुळे इन्व्हर्जन लेयर तयार होते, ज्यामुळे रात्री उष्णता अडते आणि किमान तापमान घसते. सध्याही हीच स्थिती असल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती हवामान अभ्यासक गोरे यांनी दिली.



