जळगावात बाप-लेकीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू : भाची गंभीर
Father and daughter die of electric shock in Jalgaon: Niece Gambhir जळगाव (5 डिसेंबर 2025) इलेक्ट्रिक शॉक लागल्याने बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर 16 वर्षाची भाची गंभीर जखमी झाली. ही धक्कादायक घटना शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे घडली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.
काय घडले जळगावात ?
जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत मौलाना साबीर खान नवाझ खान (35) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मौलाना साबीर यांची भाची मारिया फतेमाबी ही कपडे टाकण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्यावेळी कपडे टाकत असताना जवळच असलेल्या उच्च दाबाची हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक तारचा तिला धक्का बसला व तिला वाचवण्यासाठी आलिया ही गेली असता तिला पण जोरदार धक्का बसला मुलगी आणि भाची यांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे पाहून मौलाना शाबीर हे त्यांना वाचण्यासाठी गेले असता त्यांना देखील विजेचा जबरदस्त धक्का बसला. या घटनेत मौलाना साबीर खान (38) व त्यांची मोठी मुलगी आलिया (12) यांचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत भाची मारिया फतेमाबी ही गंभीर जखमी झाली. तिला नजीकच्या सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.


वीज कंपनीच्या दुर्लक्षाचे बळी
या घटनेत मौलाना साबीर खान यांचा लहान मुलगा मात्र थोडक्यात बचावला. गेल्या काही महिन्यांपासून उच्च दाबाची विद्युत वाहिनी ही घराजवळून गेल्याने या परिसरातून हे विद्युत वाहिनी हटवावी, अशी मागणी करण्यात आली परंतु महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.







