भुसावळातील भोळे महाविद्यालयातील कुस्तीपटूची आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड


भुसावळ (6 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी अमन गवळी (तृतीय वर्ष बीसीए) तसेच लकी सांगेले (प्रथम वर्ष कला) यांनी शेंदुर्णी येथे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याची जळगाव विभाग संघात निवड झाली. आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा, धुळे येथे 7 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार केला. यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.एस.डी.चौधरी उपस्थित होते. खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !