गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलिंडर स्फोटात 25 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये 3-4 पर्यटकांसह बहुतांश क्लब कर्मचार्‍यांचा समावेश


25 killed in cylinder blast at Goa nightclub पणजी (7 डिसेंबर 2025) : गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिलिंडर स्फोट झाल्यानंतर तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून जखमींचा आकडा कळू शकला नाही. उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात आले.

चार पर्यटकांचाही मृत्यू
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार मायकल लोबो घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला आणि 3-4 पर्यटकांचा समावेश आहे. ते म्हणाले की, तिघांचा मृत्यू भाजल्याने झाला असून, उर्वरित लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल.

नियमांना क्लबमध्ये हरताळ
सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी क्लबला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. घटनास्थळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. रविवारी सकाळी फॉरेन्सिक पथक आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास करेल.

मध्यरात्री लागली आग : 23 जणांचे मृतदेह हाती
पणजीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या अरपोरा गावात हे लोकप्रिय पार्टी स्थळ गतवर्षी उघडले मात्र मध्यरात्रीनंतर रोमियो लेनजवळील बिर्चमध्ये आग लागली. गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, 23 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये बहुतेक क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी होते. डीजीपी म्हणाले की, आग सर्वात आधी तळमजल्यावरच्या स्वयंपाकघरातून क्लबच्या इतर भागांमध्ये पसरली. त्यामुळे सर्वाधिक मृतदेह स्वयंपाकघराच्या परिसरातून मिळाले आहेत. पळून जाण्याच्या प्रयत्नात दोन लोकांचा मृत्यू जिन्यावर झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !