जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : चोरीच्या चार दुचाकींसह चोरटा जाळ्यात


Jalgaon Crime Branch’s performance : Thief caught with four stolen bikes जळगाव (7 डिसेंबर 2025) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गॅरेज मॅकेनिक असलेल्या दुचाकी चोरट्याला अटक केली असून आरोपीने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना उस्मानिया पार्क, शिवाजी नगरातील रहिवासी गॅरेज मॅकेनिक माजिदअली लियाकतअली हा गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरी करत आहे. या माहितीच्या आधारावर संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.



आरोपी पूर्वी मोटारसायकल दुरुस्तीचे काम करत असल्याने त्याला वाहनांची चांगली माहिती होती, याचाच फायदा घेत तो चोरी करत होता. माजिदअलीने चोरी केलेल्या एकूण तीन दुचाकी काढून दिल्या व आरोपीला तपासासाठी आरोपीला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. तपास नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, नेत्रमचे कॉन्स्टेबल मुबारक देशमुख आणि सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बशीर तडवी आदींच्या पथकाने केली.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !