जळगाव बायपासवर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात : दोघे गंभीर
जळगाव (8 डिसेंबर 2025) : भरधाव इको कारचे टायर फुटल्यानंतर वाहन उलटून ती समोरून येणार्या कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात कारचालकासह दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शहराच्या बाहेरून गेलेल्या पाळधी-तरसोद बायपासवर रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला.
असा घडला अपघात
नशिराबाद येथून पाळधी येथे जात असलेली पांढर्या रंगाची इको कारचे (क्रमांक 19 ई.जी.1878) टायर आव्हाणे शिवारातून बायपासवरून जात असताना पुलाच्या पुढे अचानक फुटताच चालकाचे नियंत्रण सुटून कार तीन पलट्या मारून विरुद्ध बाजूने पाळधीहून नशिराबादकडे जात असलेल्या डिझेल टँकरवर (सी.जी.07 बी.आर.3712) आदळली. अपघातात यश रमेश शिंपी (23, रा.पाळधी) व पल्लवी छाडीकर (20, रा.मेहरूण) हे दोघे जखमी झाले.









