सकल लेवा पाटीदार समाजातील लेवा वधू-वर सूचीस उस्फूर्त प्रतिसाद


भुसावळ (8 डिसेंबर 2025)  : लेवा नवयुवक संघ जळगांव व्दारा, सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुकांची वधू-वर सूची 2025-26 लेवा नवयुवक संघ जळगावने सकल लेवा पाटीदार समाजातील जिल्हा, राज्य, देश व देशाबाहेरील विवाह इच्छुकांची स्वतंत्र वर वधू पुस्तिका परिश्रमपूर्वक तयार केली आहे. वधू-वर सूचित विवाह इच्छुकांची शैक्षणिक व्यावसायिक कौटुंबिक माहितीचे तसेच शैक्षणिक व वयानुसार वर्गीकरण केले आहे.

वधू-वर सूचित तीन हजारांवर नावे, शिक्षण आणि वय या क्रमाने लावलेली असून, उच्चशिक्षीत, शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विधुर, घटस्फोटीत अशा विविध विवाहा इच्छुक स्थळांची माहिती संकलित केली आहे. त्यातून आपल्या अपेक्षांचं प्रतिबिंब असलेलं स्थळ शोधता येते. सदरची सूची आपले परिवार सार्वजनिक वाचनालय लक्ष्मी नगर, वांजोळा रोड, भुसावळ येथे उपलब्ध असून अधिक माहितीसाठी मोबाईल 9545207050 वर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !