कर्जमाफीला पैसा नाही, पण नेत्यांकडे पैशांचे गड्डे : अंबादास दानवेंच्या व्हिडिओने राजकीय वर्तुळात भूकंप
There is no money for loan waiver, but leaders have money pits: Ambadas Danve’s video causes an earthquake in political circles नागपूर (9 डिसेंबर 2025) : शेतकरी कर्जमाफीला राज्याकडे पैसा नाही म्हणणार्या सरकारकडे इतकी रोख कुठून आली? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित करीत एक खळबळजनक व्हिडिओ पोस्ट केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्यक्ती पैशांच्या भल्या मोठ्या गड्यांसह दिसत असून हा व्यक्ती दुसरा कुणी नसून शिंदे गटातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा दावा केला जात आहे. नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या आजच्या दुसर्याच दिवशी दानवे यांनी केलेल्या या आरोपामुळे अधिवेशनात सत्ताधार्यांना घेरण्याची ही विरोधकांना चांगली संधी मिळाली आहे.
सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही
या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी म्हटले की, ’या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?’ असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.






विरोधकांना सत्ताधार्यांना घेरण्याची संधी
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अंबादास दानवे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून राज्य सरकारवर आणि एका आमदारावर धक्कादायक आरोप केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या रोख पैशांच्या बॅगांसह दिसत असल्याचे, आणि तो व्यक्ती आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांनंतर विधानसभेत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण काही आमदारांकडे रोख रक्कमेचे गड्डे आहेत, असा आरोप दानवे यांनी केला. या व्हिडीओनंतर आता अधिवेशनात यावरुन विरोधकांना सत्ताधार्यांना घेरण्याची संधी मिळाली आहे.
विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला
दानवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे व्हिडीओ सार्वजनिक करा आणि सर्वांना समजेल की काही आमदार पैशांच्या गड्ड्यांसह राजकीय बंदोबस्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे आमदार हे कोण आहेत आणि किती पैशांच्या बॅगांसह फिरत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला आहे, आणि हे प्रकरण कायदेशीर तपासामध्ये जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडीओ सत्य आहे की केवळ राजकीय खेळ हे येणार्या तपासात स्पष्ट होणार आहे.
व्हिडिओ बनावट : आमदार महेंद्र दळवी
आमदार महेंद्र दळवी यांनी संपूर्ण व्हिडीओ बनावट आणि बदललेला असल्याचा दावा केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, हा व्हिडीओ माझ्याशी संबंधित नाही. अंबादास दानवे यांनी माझा चेहरा दिसेल अशा स्वरूपात संपूर्ण व्हिडीओ दाखवावा. जर मी त्या व्हिडीओमध्ये कुठेही दिसलो, तर मी कोणत्याही क्षणी आमदारकीचा राजीनामा देईन. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर उलट अंबादास दानवे यांनाच सवाल करत म्हणाले की, या व्हिडीओमध्ये लाल टी-शर्ट घातलेला व्यक्ती कोण आहे? दानवे यांनीच सांगावे.







