एमपीएससी परीक्षेच्या दिनांकांत बदल
जळगाव (9 डिसेंबर 2025) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरात नियोजित असलेल्या दोन महत्त्वाच्या परीक्षांच्या दिनांकात बदल करण्यात आला आहे. गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा पूर्वी 21 डिसेंबर 2025 रोजी 23 केंद्रांवर होणार होती, तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 4 जानेवारी 2026 रोजी 14 केंद्रांवर होणार होती.
आयोगाने 8 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकान्वये या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 4 जानेवारी 2026 रोजी आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे.









