धुळ्यातील गुरुद्वाराप्रमुख बाबा धीरजसिंह खालसा यांची प्राणज्योत मालवली


Gurudwara Pramukh Baba Dheeraj Singh Khalsa of Dhule passed away धुळे (10 डिसेंबर 2025) : गुरुद्वारातच काम करणार्‍या कर्मचार्‍याने धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंह खालसा यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. उपचार सुरू असतानाच बाबा धीरजसिंह यांची मंगळवार, 9 डिसेंबर रोजी प्राणज्योत मालवली. मुंबईतील कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबांच्या निधनाची वार्ता धुळ्यात पसरताच सेवेकर्‍यांमध्ये हळहळ पसरली.

आरोपीविरोधात वाढणार खुनाचे कलम
धुळे शहरातील मुंबई-आग्रा रोडवरील गुरुद्वाराजवळील लंगर हॉलच्या बाहेर सोमवार, 1 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग पुरणसिंग खालसा यांच्यावर उमेश कैलास माळोदे (24, रा.आडगाव, नाशिक) याने अचानक तलवारीने प्राणघातक हल्ला चढवला होता. यावेळी बाबांना वाचविण्यासाठी धावलेल्या रणविरसिंग सुखदेवसिंग खालसा आणि सुखविंदरसिंग उर्फ बग्गा हरप्रीतसिंग संधु यांच्यावरही उमेश माळोदे याने तलवारीने वार करून दोघांना जखमी केले. गुरुद्वाराच्या लंगर हॉलच्या बाहेरच ही भयानक घटना घडली होती.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबा धीरजसिंग यांना तातडीने शहरातील सिद्धेश्वर या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आणि प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले मात्र तलवारीने त्यांच्या डोके व मानेवर जोरदार वार झाल्याने बाबा धीरजसिंह यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने मुंबईला रवाना करण्यात आले मात्र मंगळवारी कोकीलाबेन अंबानी या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

आरोपीला अटक :गुन्ह्यात कलम वाढवणासर
विशेष पथकाचे प्रमुख तथा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी रविवार, 7 डिसेंबरला हल्लेखोर माळोदे याला अटक केली असून त्यास न्यायालयाने 13 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे सहा दिवस दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीविरोधात आता खुनाचे कलम वाढवण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !