निंभोर्यातील हवालदाराविरोधात 20 हजारांच्या लाच मागणी प्रकरणी गुन्हा : पथक येताच संशयीत पसार
गणेश वाघ
Case registered against constable in Nimbhor for demanding bribe of Rs 20,000: Suspects flee as soon as team arrives भुसावळ (10 डिसेंबर 2025) : तक्रारदाराविरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी निंभोरा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नावे 20 हजारांची लाच मागणी करणार्या हवालदार सुरेश पवार विरोधात जळगाव एसीबीने गुन्हा दाखल केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, बुधवार, 10 रोजी जळगाव एसीबीचे पथक निंभोर्यात तळ ठोकून होते मात्र संशयीताला कुणकुण लागल्याने तो पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणात तक्रारदाराने एका शेतकर्याकडून एक लाख 27 हजार रुपये किंमतीचा केळी माल घेवून तो दिल्लीस्थित व्यापार्याला विकला मात्र मालाचे पैसे शेतकर्याला न दिल्याने शेतकर्याने निंभोरा पोलिसात तक्रार दिली. या तक्रार अर्जाच्या चौकशीकामी संबंधित केळी माल खरेदी करणार्याला अर्थात या प्रकरणातील तक्रारदाराला चौकशीकामी निंभोरा पोलिसात बोलावले मात्र नमूद रकमेच्या दहा टक्के प्रमाणे लाच मागण्यात आली, अशी तक्रार 7 ऑक्टोबर 2025 रोजी जळगाव एसीबीकडे करण्यात आली.


संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
जळगाव एसीबीने तक्रारी अंती लाच पडताळणी केली असता हवालदार सुरेश पवार यांनी अर्ज चौकशी गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात निंभोरा सहाय्यक निरीक्षकांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून 20 हजारांची लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाले मात्र सापळ्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच मंगळवार, 9 रोजी एसीबीचे पथक निंभोर्यात धडकले मात्र संशय हवालदार कुणकुण लागताच पसार झाला. संशयीताविरोधात मात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, एएसआय दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, हवालदार संगीता पवार, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.







