तीन हजारांची लाच मागणी भोवली : काकोडा सरपंचासह शिपाई जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Bhovali demanded a bribe of three thousand rupees : Kakoda sarpanch along with a constable in the net of Jalgaon ACB भुसावळ (10 डिसेंबर 2025) : तीन हजारांच्या लाच मागणी प्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचासह शिपायाला जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तुळशिराम रामा कांबळे असे अटकेतील सरपंचाचे तर आत्माराम मेनकर असे शिपायाचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
काकोडा गावातील रहिवासी या प्रकरणात तक्रारदार आहेत. तक्रारदाराला काकोडा गावात ग्रामपंचायतीची बखळ जागा स्वतच्या नावावरून करून त्यावर शासनाचे घरकुल योजने अंतर्गत घर बांधायचे होते. त्यासाठी तकारदाराने सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांची भेट घेतल्यानंतर कांबळे यांनी 30 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामसेवक काकोडा यांच्या सहीचा नमुना नंबर 8 चा उतारा आणून दिला. हा उतारा काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे सरपंच कांबळे याने पाच हजार रुपये लाच मागितली व तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दिली.


लाच पडताळणीअंती सरपंच कांबळे यांनी तक्रारदाराच्या नावे काकोडा ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना क्रमांक 8 चा उतारा दिल्याच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीचे शिपाई आत्माराम मेहनकार यांच्या माध्यमातून तीन हजारांची लाच साक्षीदारासमक्ष मागितल्याचे निष्पन्न झाले मात्र सापळ्याचा संशय आल्याने संशयीतांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर मंगळवार, 9 रोजी आरोपींविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, एएसआय दिनेशसिंग पाटील, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.







