आळंदीतील ह.भ.प. कै.विठ्ठल महाराज चौधरी वारकरी सेवा पुरस्कार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांना प्रदान


चाळीसगाव  (10 डिसेंबर 2025) : अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा पूज्य ह.भ.प. विठ्ठल महाराज चौधरी वारकरी सेवा पुरस्कार 2025 हा चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. श्री महामंडलेश्वर 1008 ज्ञानेश्वर माऊली यांना आळंदी येथे रविवार, 7 रोजी एका समारंभात प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार गुरुवर्य ह. भ.प. मारुती बाबा कुर्‍हेकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. गौरव पत्र, सन्मान चिन्ह, रुपये 51 हजार मात्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे 15 वे वर्ष आहे. खान्देश भूमीतील व्यक्तीला प्रथमच हा पुरस्कार प्राप्त झाला.



पुरस्कार स्वीकारताना ज्ञानेश्वर माऊली यांनी आपल्या मनोगतात आपण हा पुरस्कार अत्यंत नम्रपणे स्वीकारत असल्याचे सांगत अध्यात्मिक क्षेत्रातील जबाबदार्‍या योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा व समाजसेवेचे व्रत कायम ठेवण्यासाठी कार्य करू, असे प्रतिपादन केले व सदरील पुरस्काराची रक्कम रुपये 51 हजार मात्र वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे सदकार्यास विनम्रतेने अर्पण करीत ती रक्कम संस्थेकडे सुपूर्द केली.

याप्रसंगी समाजातील सन्मानित व्यक्ती, संत गण, पत्रकार, आपल्या चाळीसगाव परिसरातील ज्येष्ठ मंडळी, भक्तगण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या चाळीसगाव तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून समाजातील सर्व स्तरातून तसेच कुमावत समाज यांच्यातर्फे ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !