जळगावातील आरोग्य निरीक्षकाची दुचाकी लांबवली : सततच्या चोर्‍यांनी वाहनधारक धास्तावले


Health inspector’s two-wheeler stolen in Jalgaon : Constant thieves scare vehicle owners जळगाव (10 डिसेंबर 2025) : शहरात दुचाकी वाहन चोरीचे सत्र सुरू असल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याची महागडी दुचाकी चोरट्यांनी रामानंद नगर पोलिस ठाणे हद्दीतील नित्यानंद नगर परिसरातून लांबवल्याची घटना 7 ते 8 दरम्यान घडली. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोर्‍यांमुळे वाहनधारक धास्तावले
रवींद्र सुखलाल पवार (50, सकळ सिद्धि सोसायटी, रूम नं. 11/4 मोहन रोड जलाराम मंदिराजवळ, नित्यायनंदनगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, ते पत्नी सोनाली पवारसह वास्तव्याला असून आरोग्य निरीक्षक पदावर ‘आय.डी.’ ग्राम पंचायत उदर्नखेडेत कार्यरत आहे. दररोज वापरासाठी त्यांच्याकडे होंडा कंपनीची 40 हजार रुपये किंमतीची सी. डी. डीलक्स मोटारसायकल क्रमांक (एम.एच.19 डी.एल.6891) असून 7 रोजी सकाळी नऊ वाजता त्यांनी दुचाकी लाक केली मात्र 8 रोजी सकाळी सात वाजता त्यांना दुचाकी जागेवर नसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !