अडीच लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात


Naib Tehsildar in Nashik caught by ACB while accepting bribe of Rs 2.5 lakh नाशिक (10 डिसेंबर 2025) : अडीच लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या सिन्नरमध्ये महसूल विभागातील नायब तहसीलदाराला नाशिक एसीबीने अटक केली आहे. संजय भिकाजी धनगर (51) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा व सुनेच्या नावे मौजे दोडी खुर्द, ता.सिन्नर येथील शेतजमीन खरेदी केली आहे. खरेदी खतावरून तलाठी दोडी खुर्द यांनी घेतलेल्या फेरफार नोंद क्रमांक 3345 रद्द होण्यासाठी व दिलेल्या तक्रारीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी धनगर यांनी 6 डिसेंबर रोजी दहा लाखांची लाच मागितली होती व अडीच लाखात तडजोड केली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार दिली व त्यानुसार सापळा रचण्यात आला. नाशिकच्या सोपान हॉस्पीटलसमोर तक्रारदाराकडून धनगर यांना लाच घेताना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वी करण्यात आला.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !