भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शंभरावर बालकांची तपासणी : मंत्री संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


भुसावळ (10 डिसेंबर 2025) : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात बुधवार, 10 डिसेंबर रोजी लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ.नीलिमा नेहेते यांनी शंभरावर लहान मुलांची आरोग्य तपासणी करीत पालकांना मुलांच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले. कमी वजनाची व अति तीव्र कमी वजनाच्या बालकांना यावेळी प्रोटीन पावडर, कॅल्शीयम सिरप व इतर औषधांसोबत पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डी.जी.जाधव होते. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, जिल्हा दुध संघाच्या संचालिका श्यामल झांबरे, नगरसेविका प्रीती मुकेश पाटील, कठोरा सरपंच रोहिणी पाटील, प्रीती मुरलीधर पाटील, डॉ.छाया देशमुख, दीपाली बर्‍हाटे, सीडीपीओ रोजतकर, जाधव, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, श्रद्धा चौधरी, वैशाली भगत, राजश्री बादशाह आदींची उपस्थिती होती.



बालकांवर औषधोपचार पौष्टीक आहाराचे वाटप
भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील आलेल्या शून्य ते सात वयोगटातील बालकांवर तपासणीनंतर औषधोपचार करण्यात आला तसेच प्रोटीन पावडर, कॅल्शियम गोळ्या, सर्दी, खोकला, जंतांचे औषध देण्यात आले व पोषण आहारात राजगिरा लाडू, केळी व बिस्कीट पुड्याचे वाटप करण्यात आले.

कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न :रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यावेळी म्हणाले की, मंडळातर्फे सलग दहा वर्षांपासून बालक तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. विशेषतः ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या असल्याने एकही बालक कुपोषित राहू नये हा या शिबिरामागील उद्देश आहे. मंडळाच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार तसेच योग्य ती औषधी पुरवली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा मंडळाच्या सर्व सदस्यांसह सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !