उंबरखेडला 11 तारखेपासून भव्य कीर्तन सप्ताह
रोज आळंदीकर महाराजांचे कीर्तन
उंबरखेडे, ता.चाळीसगाव (10 डिसेंबर 2025) : गावात 11 ते 18 डिसेंबर दरम्यान आळंदी येथील श्री गुरु नथूसिंग बाबा संस्थापित ज्ञान प्रचार दौरा मंडळ व येथील रहिवासी व आळंदीत वास्तव्यास असलेले ह.भ.प.सांदिपान महाराज येवले यांच्या विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन, प्रवचन ,भागवत कथा व व्याख्यानासाठी आळंदी, पंढरपूर येथील महानुभाव आठवडाभर मुक्कामी आहेत.
सप्ताहात रोज सकाळी 5 ते 6 काकडा भजन व प्रार्थना, 8.30 ते 10 गाथा भजन, 10 ते 12 कीर्तन/ नामवंतांचे व्याख्यान. दुपारी 3ते 4 प्रवचन. 4ते 5.30 श्रीमद भागवत कथा, 5.30 ते 6 हरिपाठ. रात्री 8.30.ते 10.30असा दिवसभर कार्यक्रम आहे.


11रोजी सकाळी दहा वाजता ह.भ.प.बाजीराव बोवा चंदिले, सचिव वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे कीर्तन 4 ते 5.30 ह.भ.प.आत्माराम बोवा कुटे आळंदी यांची भागवत कथा रात्री ह.भ.प.आत्माराम बोवा कुटे शास्त्री यांचे कीर्तन, 12 रोजी सकाळी10वाजता ह.भ.प देवराम बोवा गायकवाड यांचे कीर्तन, 4 ते 5.530ह.भ.प.आत्माराम बोवा कुटे यांची भागवत महात्म्य कथा, रात्री ह.भ.प.उल्हास बोवा सुर्यवंशी यांचे कीर्तन, 13 रोजी ह.भ.प.बंडाबोवा कराड यांचे कीर्तन आणि माजी सनदी अधिकारी उज्वलकुमार चव्हाण यांचे व्याख्यान 4 ते 5.30 ह.भ.प.बंडाबोवा कराड यांचा भागवतातील जडभरत राजा संवाद, रात्री संतवीर बंडाबोवा कराडकर यांचे कीर्तन, 14रोजी सकाळी अंतराळ संशोधक व ख्यातनाम वास्तू विशारद अविनाश शिरोडे आणि माजी नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील भोकरे यांचे व्याख्यान ज्ञानेश्वर बोवा शिंदे यांची भागवत कथा, रात्री ज्ञानेश्वर बोवा कदम मोठे माऊली यांचे कीर्तन, 15 रोजी सकाळी 10 वाजता ह.भ.प.श्रावण बोवा अहिरे मालेगाव यांचे कीर्तन, वारकरी शिक्षण संस्था विश्वस्त ज्ञानेश्वर बुवा शिंदे यांची भागवत कथा, रात्री ह.भ.प.परमेश्वर बोवा जायभाये यांचे कीर्तन, 16 रोजी सकाळी दहा वाजता गीतामंदीर पैठण व पंढरपूर अध्यक्ष ह.भ.प.विष्णू बोवा जगताप यांचे कीर्तन दुपारी ह.भ.प.ज्ञानेश्वर बोवा शिंदे यांची भागवत कथा, रात्री. ज्ञानेश्वर बोवा शिंदे स्थापत्यशास्त्रज्ञ् माऊली यांचे कीर्तन, 17 रोजी ह.भ.प.पुंडलिक बोवा जाधव यांचे कीर्तन, दुपारी ज्ञानेश्वर बोवा शिंदे यांची भागवत कथा व रात्री वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष संदीपान बोवा शिंदे यांचे कीर्तन
दुपारी पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा, 18 रोजी सकाळी गाथामंदीर देहूचे अध्यक्ष पांडुरंग बोवा घुले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन, प्रवचन, व भागवत कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक ह.भ.प.संदीपान महाराज येवले व ग्रामस्थांनी केली आहे. संदीपान महाराज येवले यांचे पणजोबा नारायण गोपाळ येवले यांनी असाच भव्यदिव्य सप्ताह 80 वर्षांपूर्वी केला होता.







