भुसावळातील हिंदी महाविद्यालयाचे रा.से.यो. चे विशेषकालीन शिबिर
Special camp of N.S.Y. of Hindi College in Bhusawal भुसावळ (12 डिसेंबर 2025) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाद्वारा 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2025 या सात दिवसीय शीतकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
या शीतकालीन शिबिराचे उद्घाटन अॅड.महेश दत्तजी तिवारी (हिंदी सेवा मंडळ कोषाध्यक्ष) व विशेष अतिथी गोपाल दाजी अग्रवाल (हिंदी सेवा मंडळ उपाध्यक्ष) यांच्याहस्ते करण्यात आले. शिबिराचे आयोजन अध्यक्ष प्राचार्य डॉ.रमेश जोशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.




या शिबिरात दररोज बौद्धिक प्रबोधन होणार आहे. त्यात प्रमुख वक्ता म्हणून मुकेश अग्रवाल, संध्या सोनी व धीरज सोनी, मंदाकिनी केदार, डॉ.प्राजक्ता जोशी यांना आमंत्रित करण्यात आले.. शिबिरापूर्वी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 5 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. त्यात त्या कार्यक्रमात शिबिराविषयी सविस्तर माहिती डॉ.सुधीर शर्मा यांनी सांगितली.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
उद्घाटक अॅड.महेश दत्त तिवारी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सेवा व्रताची माहिती सांगत गाडगे बाबाची शिकवण सेवा परमोधर्म, सेवा मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे सांगत सर्वांनी श्रमदान व सेवा व्रत अंगीकार करावे, असे सांगितले. संपूर्ण नियोजन डॉ.सुधीर शर्मा व डॉ.विवेक जोशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सुधीर शर्मा व आभार प्रदर्शन प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. शिबिरात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.