कुमार साहित्य संमेलनात भुसावळातील एन.के.नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश


Success of students of N.K. Narkhede Vidyalaya, Bhusawal in Kumar Sahitya Sammelan भुसावळ (12 डिसेंबर 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव अंतर्गत झालेल्या नवव्या कुमार साहित्य संमेलनामध्ये दहावीची विद्यार्थिनी जलश्री देवेद्रकुमार साळुंके हिने काव्यवाचन तसेच सहावीतील रसिका प्रशांत भंगाळेने कथाकथन स्पर्धेत सहभागी होवून 20 डिसेंबर 2025 रोजी होणार्‍या जिल्हास्तरीय नवव्या कुमार साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे.

विज्ञान प्रदर्शनातही विद्यार्थ्याचा डंका
बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी गटसाधन केंद्र, पंचायत समिती भुसावळ अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भुसावळच्या आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यायलयात झाले.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेतील दहावीचा विद्यार्थी कैसर एजाज देशमुख हा विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. कैसरची जिल्हास्तरीय निवड झाली तसेच सहावीचा योग विशाल सुर्यवंशी हा विद्यार्थी (उपकरण- सोलर एनर्जी) उच्च प्राथमिक स्तरातून उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
प्राप्त





विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर एन.नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन.नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेतील सर्व सभासदातर्फे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शिक्षक व पालक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !