एक लाखांची लाच घेताना पोलिस निरीक्षक एसीबी जाळ्यात
Police inspector caught by ACB while taking bribe of Rs. 1 lakh यवतमाळ (12 डिसेंबर 2025) : एक लाखांची लाच घेताना पोलिस निरीक्षकाल एसीबीने अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नरेश रणधीर असे लाचखोर पोलिसांचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अवधुतवाडी येथील पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
उधारीचे पैसे परत न केल्याने एका व्यक्तीने अवधुतवाडी पोलिसात तक्रार दिली. ही रक्कम वसूल करण्यासाठी तीन लाखांची लाचेची मागणी ठाणेदार नरेश रणधीर यांनी तक्रारदाराकडे केली व त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना ठाणेदार नरेश रणधीर यांना पकडण्यात आले. अमरावती लाचलुचपत विभागाने ही कारवाई अवधुतवाडी पोलिस ठाण्यातच केली. याप्रकरणी ठाणेदार रणधीर यांच्यावर अवधुतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला.


लाच पडताळणीत मागितले तीन लाख
तक्रारदाराच्या मित्राला पैशाची गरज होती, त्यामुळे तक्रारदाराने मध्यस्ती करून दुसर्यांकडून 10 लाख रुपये उसणवारीवर घेऊन त्याला दिले होते परंतु दिलेले पैसे परत मागितल्यानंतर तो उडवा-उडवीचे उत्तरे देत होता. सहा महिने लोटले तरी पैसे परत दिलेच नव्हते. शेवटी तक्रारदाराने अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती परंतु पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांनी तक्रारदाराकडे पाच लाख मागितले व पडताळणीवेळी तीन लाखांची मागणी केल्याची बाब उजेडात आली. त्या अनुषंगाने अमरावती लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता एक लाख रुपये लाच स्वीकारताना ठाणेदार नरेश रणधीर यांना रंगेहात अटक करण्यात आली.







