कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर मध्य रेल्वे महाव्यवस्थापक उद्या नाशिकमध्ये


Against the backdrop of the Kumbh Mela, the General Manager of Central Railway will be in Nashik tomorrow. भुसावळ (13 डिसेंबर 2025) : नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) विवेककुमार गुप्ता हे रविवार, 14 रोजी नाशिकसह परिसरातील रेल्वे स्थानकांना भेटी देऊन स्थानकांवरील सुविधांची पाहणी करतील. कुंभमेळा असल्याने रेल्वे स्थानकांवर काय-काय सुविधा आहेत आणि काय देणे गरजेचे आहे, याची पाहणी महाप्रबंधक गुप्ता हे करणार आहे.

गर्दीच्या दृष्टीने नियोजन
आगामी सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकांवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता काय उपाय-योजना आखणी करायच्या आहे, याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून केले जाणार आहे. याच पार्श्वभुमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) विवेककुमार गुप्ता हे नाशिक रोड रेल्वे स्थानकाला भेट देतील. नाशिक रोड रेल्वे स्थानकासोबत कसबे-सुकेने, देवळाली, मनमाड या रेल्वे स्थानकांना भेट देणार आहे. गर्दी विभागण्यासाठी काय उपाय-योजना करता येईल, त्या स्थानकांवर काय सुविधा पुरविता येईल, याची पाहणी केली जाणार आहे. रविवारी होणार्‍या पहाणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन अलर्ट झाले आहे. विविध विभागातील अधिकारी यांनी कामाचे नियोजन केले आहे.



नजीकच्या स्थानकावरही सुविधा
कुंभमेळ्याच्या काळात नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक रोड स्थानकाच्या जवळपासच्या रेल्वे स्थानकांवर सुध्दा सुविधा पुरविल्या जाणार असल्याने नाशिक रोड स्थानकावर होणारी भाविकांची गर्दी विभागली जाणार आहे. यामुळे गर्दी, गोंधळ होणार नाही. पर राज्यातून येणार्‍या भाविकांना कुंभमेळ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर मार्गदर्शक फलक लावले जाणार आहे. त्यामुळे बाहेरील भाविकांना सुविधा मिळणार आहे. रविवारी डीआरएम पुनीत अग्रवाल यांच्यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी पाहणीच्या वेळी उपस्थित राहतील.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !