भुसावळ-शेगाव पायी वारीसाठी नोंदणी सुरू

1 जानेवारीला अष्टभुजादेवी मंदिरातून होणार प्रारंभ


Registration has started for the Bhusawal-Shegaon pilgrimage on foot भुसावळ (13 डिसेंबर 2025) : गजानन महाराज सेवा ग्रुप भुसावळ संचलित गजानन ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भुसावळ ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वारी येत्या 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता अष्टभुजादेवी मंदिरापासून शुभारंभ करणार आहे.

वारीत सहभागी होऊ इच्छिणार्‍या भाविकांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ज्या भाविकांना वारीत सामील व्हायचे असेल तर त्यांनी अध्यक्ष राजेंद्र पाटील, कौस्तुभ देवधर (प्रोफेसर कॉलनी), योगेश ठाकूर (पिंटू ठाकूर),शरद सी. देवरे, पद्माकर जैन आदींकडे नाव नोंदणी करावी. आयोजकांनी सर्व भाविकांना अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !