मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांविरोधात मोहिम : सात कोटी 51 लाखांचा दंड वसुल

संपूर्ण विभागात तिकीट तपासणी मोहिम प्रशासन तीव्र करणार


Central Railway’s campaign against ticketless travelers : Fines worth Rs 7.51 crore collected. भुसावळ (13 डिसेंबर 2025) : पर्यटनाला जात असलेल्या प्रवाशांमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढल्याने गर्दीचा फायदा घेत फुकट्या प्रवाशांची संख्या सुध्दा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. यात आरक्षण नसतांना आरक्षण डब्यातून प्रवास करणे, विना तिकीट प्रवास करणे अश्या विविध कारणाखाली विशेष तिकीट पथकांकडून कारवाई केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात विभागाने 158.47 कोटी रूपयांचा महसूल जमा केला. तो नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे.

कारवाईने फुकट्यांच्या गोटात खळबळ
रेल्वे प्रशासनाकडून विशेष तिकीट तपासणी मोहिम वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. नाशिक ते मुर्तीजापूर व भुसावळ ते खंडवा या मार्गावर ही तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात फुकटे प्रवासी व आरक्षण नसतांना सुध्दा आरक्षण डब्यातून प्रवास करणारे प्रवासी तिकीट तपासणीसांच्या रडारवर आहे. यामुळे प्रत्येक रेल्वे गाडीत तिकीट तपासणी केली जात आहे.





वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळालेले उत्पन्न
प्रवासी उत्पन्न – 78.82 कोटी
इतर कोचिंग उत्पन्न- 7.31 कोटी
मालवाहतूक उत्पन्न- 70.29 कोटी (उद्दिष्ठापेक्षा 17 टक्के जास्त)
विविध उत्पन्न- 2.05 कोटी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !