ऑन डिमांड स्पेशल : मुंबई-हावडा, मुंबई-नागपूरदरम्यान विशेष गाड्या धावणार
On-demand special trains will run between Mumbai-Howrah and Mumbai-Nagpur. भुसावळ (13 डिसेंबर 2025) : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता आणि प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने मुंबई ते हावडा आणि मुंबई ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या ‘ऑन डिमांड स्पेशल’ म्हणून नियोजित असून विविध महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना जोडणार्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची उपलब्धता वाढणार आहे.
मुंबई-हावडा (02869) विशेष गाडी मुंबई येथून 13 डिसेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता सुटेल तर दुसर्या दिवशी हावडा येथे रात्री 8.55 वाजता पोचेल. गाडी 02870 हावडा मुंबई स्पेशल गाडी हावडा येथून 11 डिसेंबरला दुपारी 1.55 वाजता सुटली आहे, ती दुसर्या दिवशी मुंबईत रात्री 11.45 वाजता पोहोचली. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, राउलकेला, टाटानगर आणि खरगपूर येथे थांबे दिले आहे.




मुंबई-नागपूर ही विशेष गाडी 15 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता मुंबईतून सुटेल व नागपूरला दुसर्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात नागपूर मुंबई स्पेशल (01012) ही गाडी 14 डिसेंबरला नागपूर येथून रात्री 10.10 वाजता सुटेल व मुंबईत दुसर्या दिवशी 2.05 वाजता पोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबणार आहे.