भुसावळातील हिंदी महाविद्यालयात महारक्तदान शिबिर


A mega blood donation camp was organized at the Hindi College in Bhusawal. भुसावळ (13 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात हिंदी सेवा मंडळाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त प्राचार्य डॉ.रमेश जोशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सुधाकर सनांसे, रोटरी क्लब ऑफ भुसावळचे किशोर पाचपांडे यांच्याहस्ते करण्यात आले.

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान : डॉ.शर्मा
शिबिराची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. धन्वंतरी ब्लड सेंटर भुसावळचे डॉ.महाजन, देवेंद्र शिरनामे, कामिनी चौधरी यांच्या टीमने रक्तदान करणार्‍या रक्तदाताचे रक्त घेऊन सहकार्य केले. शिबिरात रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान केले. याप्रसंगी डॉ.सुधीर शर्मा यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदानामुळे आपण गरजूंचे प्राणवाचवू शकतो म्हणून रक्तदान केले पाहिजे.





शिबिराच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन डॉ.विवेक जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.अनुपम शर्मा, प्रा. ज्योती ओस्तवाल, प्रा.शीबा खान, प्रा.समता तायडे, प्रा.गणेश घोडेकर, प्रा.कविता पांडव, प्रा.हितेश गुप्ता, डॉ.प्रवीण जाधव यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !