भरधाव डंपर अ‍ॅपेवर आदळला : जामनेरच्या माय-लेकींसह तिघे जागीच ठार


A speeding dumper truck collided with an auto-rickshaw: Three people, including a mother and daughter from Jamner, were killed on the spot. जामनेर (14 डिसेंबर 2025) : भरधाव डंपर अ‍ॅपे रिक्षावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चिंचखेडा, ता.जामनेर येथील मायलेकींसह तिघे ठार झाले तर पाच प्रवासी जखमी झाले. हा अपघात भुसावळ-जामनेर रस्त्यावरील गंगापुरी गावाजवळ शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. मृतांमध्ये निकिता गोपाळ निंबाळकर (20) व सरला गोपाळ निवाळकर (39 रा.चिंचखेडा, ता.जामनेर) या मायलेकींसह प्रमोद औराम गुरुभैया (32, रा.तळेगाव) यांचा समावेश आहे.

असा घडला अपघात
भुसावळहून जामनेरकडे प्रवाशांना घेवून येत असलेली अ‍ॅपे रिक्षा (एम.एच.19 बी.3004) ला भुसावळकडे जाणार्‍या मिक्सर डंपर (एम.एच. 19 सी.एक्स.2981) ने गंगापुरी गावाजवळ समोरून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला तर जयेश गोपाळ नेवाळकर (19, रा.चिंचखेडा), योगेश गायकवाड (वय 45), सुरेश विठ्ठल कापडे (50), संगीता सुभाष चौधरी (50, तिघे रा.संभाजीनगर), अखिलेश कुमार (50, रा.उत्तरप्रदेश) जखमी झाले. जखमींवर जामनेरात उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला.



पुढील महिन्यात होणार होते लग्न
अपघात मयत झालेल्या निकिता निंबाळकर या तरुणीचा महिनाभरापूर्वीच साखरपुडा झाला होता व येत्या 23 जानेवारी रोजी लग्न ठरले होते मात्र, सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !