अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने भरपाई द्या : आमदार अमोल जावळेंची हिवाळी अधिवेशनात मागणी
Provide immediate compensation to farmers affected by unseasonal rains: MLA Amol Jawale’s demand in the winter session नागपूर (14 डिसेंबर 2025) : नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्यांचा महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.
यावल-रावेर मतदारसंघात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, उडीद, मूग व कपाशी ही पिके पूर्णतः नष्ट झाली असून शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.









