लोकमान्य टिळक टर्मिनस-सबलपूर, भुसावळ-प्रयागराज विशेष गाड्या धावणार
प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेचा ‘ऑन डिमांड स्पेशल’ निर्णय
Due to increasing passenger demand, Central Railway takes the ‘on-demand special’ train decision भुसावळ : (14 डिसेंबर 2025) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि आगामी प्रवासाची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-सबलपूर तसेच भुसावळ-प्रयागराज दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या ‘ऑन डिमांड स्पेशल’ स्वरूपात चालविण्यात येणार असून प्रवाशांना सुरक्षित, जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
अशा धावतील गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनस-सबलपूर दरम्यान गाडी क्रमांक 08402 ही विशेष गाडी मंगळवार, 16 डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी दुपारी 3.30 वाजता सबलपूर येथे पोहोचेल. या गाडीची परतीची सेवा गाडी क्रमांक 08401 म्हणून रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथून रात्री 11वाजता सुटून तिसर्या दिवशी सकाळी 8 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोचेल.




या विशेष गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खारियार रोड, कांताबाजी, टीटलागढ, बलांगीर व बरगड येथे थांबे असतील.
दरम्यान, भुसावळ ते प्रयागराज दरम्यान विशेष एकेरी गाडीही चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01213 ही विशेष गाडी सोमवार, दि. 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.35 वाजता भुसावळ येथून सुटून दुसर्या दिवशी 11.35 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या गाडीला खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना व माणिकपूर येथे थांबे देण्यात आले आहेत.