हिंदी सिनेसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत : बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ ची चर्चा
Breaking all records in the Hindi film industry: ‘Dhuranthar’ is the talk of the town at the Bollywood box office. मुंबई (14 डिसेंबर 2025) : हिंदी सिनेसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढण्याचा विक्रम धुरंधर चित्रपटाने केला असून बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर’ची चर्चा आहे. दुसर्या आठवड्यातही या चित्रपटाने वेगळाच इतिहास रचला आहे तर दुसर्या शनिवारी सर्वाधिक कमाई करणारा ‘धुरंधर’ हा हिंदी सिनेमाच्या इतिहासातील पहिला चित्रपट ठरला आहे.
मेगाब्लॉकबस्टर चित्रपटांनाही टाकले मागे
दुसर्या शनिवारी ‘धुरंधर’ने तब्बल 53.70 कोटी रुपयांची कमाई केली. याआधी हा विक्रम कोणत्याही चित्रपटाला गाठता आला नव्हता. या एका दिवसाच्या कमाईने ‘धुरंधर’ने ‘पुष्पा 2’, ‘छावा’, ‘स्त्री 2’, ‘अॅनिमल’, ‘जवान’ यांसारख्या मेगाब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकले आहे.


दुसर्या शनिवारी कोणता चित्रपट कमाईत अव्वल
दुसर्या शनिवारी सर्वाधिक कमाई करणार्या टॉप 10 हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर’ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दुसर्या क्रमांकावर ‘पुष्पा 2 (हिंदी)’ने 46.50 कोटी, तर तिसर्या क्रमांकावर ‘छावा’ने 44.10 कोटींची कमाई केली आहे. ‘स्त्री 2’ (33.80 कोटी), ‘अॅनिमल’ (32.47 कोटी), ‘गदर 2’ (31.07 कोटी), ‘जवान’ (30.10 कोटी), ‘सैयारा’ (27 कोटी), ‘बाहुबली 2 (हिंदी)’ (26.50 कोटी) आणि ‘द कश्मीर फाइल्स’ (24.80 कोटी) हे चित्रपटही या यादीत आहेत. मात्र, या सर्वांवर मात करत ‘धुरंधर’ने नवा बेंचमार्क सेट केला आहे.
दुसर्या आठवड्यातील शुक्रवारी ‘धुरंधर’ने 34.70 कोटी, तर शनिवारी 53.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील एकूण नेट बॉक्स ऑफिस कमाई 306.40 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
तगडी स्टारकास्ट, दमदार कथा, जबरदस्त अॅक्शन आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे ‘धुरंधर’ सध्या प्रत्येक रेकॉर्ड मोडत आहे. ट्रेड तज्ज्ञांच्या मते, येत्या दिवसांतही या चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. ‘धुरंधर’ लवकरच हिंदी सिनेमातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरू शकतो.







