आत्मसन्मान फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद : पूनम विजय फालक
Appreciation of Atmasamman Foundation’s work : Poonam Vijay Falak भुसावळ (15 डिसेंबर 2025) : बोदवडमधील आत्म सन्मान फाउंडेशन करीत असलेल्या मनोरुग्णाची सेवा हा खरोखरच कौतुकास्पद उपक्रम आहे. त्यांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. डॉ.विजय पाटील व त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या समवेत असलेले कर्तव्यदक्ष, कार्यतप्तर व सेवाभावी सेवक वर्ग यांचे कार्य हे खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सर्वांनी सढळ हाताने मदत केलीच पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भाव निवेश व सन्मानाची अपेक्षा न ठेवता वंचित, पीडित, मनोरुग्ण ,मतिमंद, परिवाराने टाकून दिलेल्या अशा लोकांची सेवा मनोभावे करणे हे आजच्या युगात शोधून सापडणार नाही, असे गौरवोद्गार नारीरत्न पुरस्कार प्राप्त ताप्ती पब्लिक स्कूलच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व विद्यार्थी प्रिय शिक्षिका पुनम विजय फालक यांनी केले.
कुटुंबासमवेत सुपुत्र जय फालक, सुपुत्री लावण्या फालक यांनी वाढपीचे काम करून मनोभावे सेवा केली व आस्थेवाईकपणे सर्वांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच आर्थिक मदत केली. भेट देवुन धन्य झाले व सर्वांच्या कार्याला सलाम केला. याप्रसंगी आत्मसन्मानचे सदस्य चरणसींग पाटील, व्यवस्थापक रवी माळी उपस्थित होते.



