जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई : दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लांबवणारे त्रिकूट जाळ्यात
Jalgaon MIDC police action : Trio who stole cash from a two-wheeler’s storage compartment apprehended जळगाव (15 डिसेंबर 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुचाकींच्या डिक्कीतून रोकड लांबवणार्या त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या अटकेनंतर एका गुन्ह्याची उकल करण्यात आली असून 83 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
काय घडले जळगावात ?
शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे दीपक रमेशचंद गगराडे यांचे संतोषी माता नगरात किराणा दुकान आहे. 10 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दिवसभरातील धंद्योचे 83 हजार रुपये त्यांनी दुचाकी (एम.एच.19 सी.एम. 3038) च्या डिक्कीत ठेवले व काशिनाथ चौकाकडून शेरा चौकाकडे जाणार्या रस्त्यावरील भूमी हॉटेलच्या समोर असलेल्या मेडीकलवर गगराडे हे औषधी घेण्यासाठी थांबवले मात्र औषधी घेवून परतताच त्यांना दुचाकीच्या डिक्कीतील 83 हजारांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेतली.


तीन आरोपीनां अटक
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केल्यानंतर शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांनी जळगाव शहरातील दत्त नगर परिसरात सापळा रचून ऋषीकेश अजय तेली (रा.दत्त नगर, मेहरुण, जळगाव), रोहित गुरुदयाल बघेल (रा.दत्त नगर, मेहरुण, जळगाव), अनुज ईश्वर सोनवणे (रा.दत्त नगर, मेहरुण, जळगाव) यांना अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, एएसआय विजयसिंग पाटील, गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, नितीन ठाकुर, किरण पाटील, गणेश ठाकरे, राहुल घेटे, नरेंद्र मोरे यांनी केली.







