भुसावळातील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनात कलागुणांची उधळण
A display of artistic talent was witnessed at the annual gathering at Nahata Junior College in Bhusawal. भुसावळ (15 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते.
यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष रजनी सावकारे, स्मिता फालक यांची उपस्थिती होती. उद्घाटन डॉ.मोहन फालक यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, संचालक श्यामशेठ दरगड, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच.बर्हाटे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील आणि उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका स्वाती पाटील यांची उपस्थिती होती.


विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण
विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, तबला-वादन यामधून आपल्या कला सादर केल्या. तबला वादकाने सर्वांना मोहित केले. क्रिकेट, बॅडमिंटन, रांगोळी, मेहंदी, टाकाऊपासून टिकाऊ, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला आणि ब्रायडल मेकअप या स्पर्धांचे आयोजन केले होते. सांस्कृतिक मंडळाच्या चेअरमन प्रा.सुरेखा भोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास सांगताना पन्नास वर्षाचा हा प्रवास केवळ वर्षांचा नसून ज्ञान, संस्कार आणि पिढ्या न पिढ्यांच्या प्रगतीचा आहे, असे मत मांडले.
यांनी घेतले यशस्वीतेसाठी परिश्रम
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचलन प्रा.किर्ती नागदेव तर आभार प्रा.रमा मसाने यांनी मानले. यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी कला मंडळाचे चेअरमन प्रा.ललित टाक, प्रा.एम.एच.सरोदे, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.वैशाली पाटील, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.आर.एम.पाटील, सांस्कृतिक मंडळाचे चेअरमन प्रा.सुरेखा भोळे, प्रा.ज्योती पाटील, प्रा.टी.एम.पाटील, प्रा.रमा मसाने, प्रा.संजीवनी खाचणे, प्रा.अर्चना सपकाळे, प्रा.जे.टी.बेंडाळे, भगवान तायडे, मुकेश फिरके, अतुल किनगे, गोकुळ फालक, मिलिंद फेगडे, भगवान पाटील, महेश पाटील, नंदू पाटील, सतीश पाटील, निखील भारंबे यांचे सहकार्य लाभले. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभन्याचे प्रा.प्रशांत पाटील कळवतात.







