गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये महिलेची पर्स लांबवली : मिरजचा चोरटा यंत्रणेच्या जाळ्यात


Woman’s purse stolen on Gorakhpur Express: Thief from Miraj caught in the system’s net. भुसावळ (16 डिसेंबर 2025) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणार्‍या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत भुसावळ रेल्वे स्टेशनवरील आरपीएफ व गुन्हे रोख पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत लेडीज पर्स चोरीप्रकरणातील संशयीताला अटक करून पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. ही कारवाई रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्हीफुटेजच्या माध्यमातून करण्यात आली.

पर्स चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
8 डिसेंबर रोजी पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस (15066) या गाडीच्या स्लीपर कोच एस-2 मध्ये बर्थ क्रमांक 15 वर प्रवास करणार्‍या प्रवाशाची स्काय ब्ल्यू रंगाची लेडीज पर्स चोरी झाल्याची माहिती भुसावळ मंडळ नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली होती.माहिती मिळताच आरपीएफने संबंधित कोचच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता,एक संशयित व्यक्ती पर्स घेऊन उतरतानाचे दिसले. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता भुसावळ स्टेशनच्या दक्षिण बाजूस संशयित व्यक्ती फिरताना दिसला. ड्युटीवर तैनात आरपीएफ अधिकारी सुदामा यादव, सीपीडीएस पथकातील इमरान खान, महेंद्र कुशवाहा व भूषण पाटील यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत संशयीताने त्याचे नाव रफिल शत्रुघन काळे (वय 19, रा. मिरज, जि. सांगली) असल्याचे सांगितले.





झडतीदरम्यान त्याच्याकडून स्काय ब्ल्यू रंगाची लेडीज पर्स, त्यामध्ये मोबाईल, चांदीची पायल,रोख रक्कम तसेच संबंधित महिलेचे आधारकार्ड असा सुमारे 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयीताने 8 डिसेंबर रोजी झोपलेल्या प्रवाशाची संधी साधून चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर संशयीतास पुढील कारवाईसाठी जीआरपी भुसावळकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणी जीआरपीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !