भुसावळात जयंत पाटलांचा निषेध : नाभिक संघाचे आंदोलन
Jayant Patil protested against in Bhusawal : Barbers’ association stages a protest भुसावळ (16 डिसेंबर 2025) : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाचा अवमान होईल, असे वक्तव्य केल्याने नाभिक समाज संतप्त झाला आहे. भुसावळातील नाभिक समाजाने आमदार पाटील यांनी समाजाची माफी मागण्याच्या मागणीसाठी सोमवार, 15 रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक संघाच्या माध्यमातून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.
आमदारांवर कारवाईची मागणी
नाभिक समाज स्वच्छता, आरोग्य व सार्वजनिक सेवेशी निगडित कामांद्वारे समाजाला हातभार लावणारा आहे त्यामुळे या समाजाबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी समाजाची जाहीर माफी मागावी तसेच आमदार पाटील यांच्या विधानाची ध्वनीचित्रफीत तपासून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघाने केली. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे, अनिल टोंगे, संजय बोरसे आदी उपस्थित होते.




अत्याचार प्रकरण निवेदन
नाशिक जिल्ह्यातील 9 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नाभिक संघाने प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, विशेष सरकारी वकिल म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, 100 दिवसांच्या आत दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.