फेकरीत राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
A free health check-up camp was organized in Fekri by the National Service Schemeभुसावळ (16 डिसेंबर 2025) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रमेश जोशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.विवेक जोशी, सचिव राम पंजाबी, प्रोजेक्ट मॅनेजर किशोर पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी ग्रामीण रुग्णालय, फेकरी, तालुका भुसावळ येथे रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ.संगीता दवंगे (मेडिकल ऑफिसर), वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पना दवंगे तसेच सरपंच चेतना भिरूड, डॉ.हर्षद वाजपेयी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका करुणा घोडेश्वर व सर्व आशा वर्कर्स यांनी सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी घरोघरी जाऊन मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी गावकर्यांना प्रोत्साहन दिले. शिबिरात दीडशे गावकर्यांनी आपली वैद्यकीय तपासणी केली. डॉक्टरांनी विविध आजारांची रुग्ण तपासणी केली. डॉ.विवेक जोशी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. शिबिरात स्वयंसेवक तसेच तपासणीसाठी बहुसंख्य रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा या शिबिरासाठी उपस्थित होते.



