घटस्फोटाचे बनावट दस्तावेज दाखवून दुसरा विवाह : पतीसह सात जणांविरोधात गुन्हा
A case has been registered against the husband and seven others for showing fake divorce documents and entering into a second marriage जळगाव (16 डिसेंबर 2025) : पहिली पत्नी असतानादेखील आणखी एका महिलेशी विवाह केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात पतीसह जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे संशयीतांनी घटस्फोटाचे बनावट कागदपत्र दाखवल्याचा आरोप तक्रारीत आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
37 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार त्यांचा विवाह स्वप्निल अरुण चौधरी (रा. वासू कमल विहार, गुजराल पेट्रोल पंप, जळगाव) यांच्याशी झाला. त्यांचा व पतीचा घटस्फोट झाल्याबाबतचे बनावट दस्तऐवज तयार करून आणि ते दस्तऐवज दुसरी पत्नी संशयित राजश्री रोहिदास कोळी उर्फ राजश्री स्वप्निल चौधरी हिच्यावडिलांना दाखवून ते खरे असल्याचे सांगितले तसेच सात जणांनी संगनमताने स्वप्नीलचा विवाह लावून फिर्यादी विवाहितेची फसवणूक केली.




यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
संशयितांमध्ये तक्रारदार महिलेचा पती स्वप्नील अरुण चौधरी, त्याने विवाह केलेली दुसरी पत्नी राजश्री रोहिदास कोळी उर्फ राजश्री स्वप्निल चौधरी (35), कमल अरुण चौधरी (सर्व रा.वासुकमल विहार, जळगाव), राजेश पंढरीनाथ पाटील (रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी, जळगाव), डॉ.मधुकर बळीराम चौधरी, विमल मधुकर चौधरी, संदीप मधुकर चौधरी, विद्या संदीप चौधरी यांच्यासह लग्न लावणार एक ब्राह्मण (पूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा.वर्सी, ता.शिरपूर, जि.धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.