भडगावातील दोन चिमुकल्यांचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू
Two young children from Bhadgaon tragically died after falling into a drain भडगाव (16 डिसेंबर 2025) : शहरातील आदर्श कन्या शाळा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिक्षण घेणार्या अवघ्या तीन व चार वयोगटातील दोन बालकांचा शाळेच्या संरक्षण भिंतीवरून थेट नाल्यात पडून मृत्यू झाला. मन हेलावणारी ही धक्कादायक घटना मंगळवार, 16 डिसेंबर रोजी घडली. या घटनेनंतर पालकवर्ग संतप्त झाला आहे. अंश सागर तहसीलदार (तीन वर्ष सहा महिने, रा.आदर्श कॉलनी, भडगाव) व मयंक ज्ञानेश्वर वाघ (चार वर्ष दोन महिने, रा.बालाजी गल्ली, भडगाव) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
शाळा प्रशासाविरोधात संताप
बराच वेळ शोधाशोध सुरू असताना नाल्यातील पाण्यात फुगून आलेल्या अवस्थेत दोन्ही बालकांचे मृतदेह आढळले तर पालवर्गात ही बातमी कळताच मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली. यास दुर्दैवी घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नर्सरीत शिकणारी ही बालके वर्गाबाहेर कशी गेली? त्यावेळी शिक्षकांची देखरेख का नव्हती, तसेच इतक्या लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापनाने कोणतीही ठोस व्यवस्था का केली नाही? असे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.









